कविता

संभ्रमात मी सखे...

संभ्रमात मी सखे
का चांदण्यात तुझे कवडसे
चालतो एकटाच मी
वाटेवरी तुझे ठसे

भास हे हवे हवे
पुन्हा पुन्हा तुझे उन्मेष नवे
पापण्यातले माझ्या
बेभान हे हिरवे थवे
संभ्रमात मी सखे
का चांदण्यात तुझे कवडसे

अथांग विश्व हे उभ
व्यापून त्याला फक्त तूच उरे
दाही दिशा उण्याच आता
सारीकडे तुझेच सडे
संभ्रमात मी सखे
का चांदण्यात तुझे कवडसे

नादातूनी तूच बोले
वाऱ्यातूनी वाहणे तुझ
बरसतेस  होऊन पाऊस तू
अंकुरणे हे हिरवे माझे
संभ्रमात मी सख
का चांदण्यात तुझे कवडसे

      --/गणेश गोडसे, अकलूज/--
              ९५२७७०२२७०

     ganeshgodase99@gmail.com


--------------------------------------------------------------------------------------
विषय:- गुरु

गुरु म्हणजे......
गुरु मार्गदर्शक आयुष्याचा
गुरु जीवनाला  आकार देणारा
गुरु कुंभाररूपी अंश ईश्वराचा

गुरु म्हणजे......
गुरु आपले मार्गदर्शक
गुरु प्रतिमा स्वछ्तेची
गुरु आई, वडील आणि शिक्षक

गुरु म्हणजे......
गुरु मार्ग दाखविणारा
गुरु अडचणी सोडविणारा
गुरु आपल्याला तारणारा

गुरु म्हणजे......
गुरु आयुष्याला दिशा देणारा
गुरु आयुष्याला वळण देणारा
गुरु खरा मार्ग दाखविणारा

गुरु म्हणजे.......
गुरु प्रेमरूपी अखंड झरा
गुरु घडविणारा आपल्याला
गुरु शिल्पकार खरा

किशोर बळीराम चलाख

सांगली
------------------------------------------------------------------------------------------

अबोल प्रीत

बोलायच असत तेव्हा
तू भेटत नाहीस
दिसतेस तू मला तेव्हा
शब्दच फुटत नाही.

एकांतात स्मरणाने तुझ्या
हळूच मी हसतो
प्रत्यक्षात मात्र भेटल्यावर
हसूच विसरून जातो.

तूही प्रेम करतेस माझ्यावर
पण तस दाखवत नाहीस
डोळ्यातील भावना मात्र
लपवू शकत नाहीस.

आपल्या या प्रेमाला
दिशा तूच देऊ शकतेस
माझी अबोल प्रीत
तू या कवितेतून समजू शकतेस.

 चंद्रशेखर गुलाबराव पाटील.
पत्ता:3, अंबिका कॉलनी, वाघेश्र्वरी रोड,हायवे कॉर्नर, ता./जिल्हा: नंदुरबार (महाराष्ट्र राज्य)
मोबाईल नंबर:7350571247
-------------------------------------------------------------------------------------------------------
पर्यावरण

दरवर्षी एक झाड लावूया
शुध्द हवा मोफत घेवूया
धरती हिरवीगार करूया
 आरोग्य   छान    ठेवूया

दुषीत हवेला रोखू या
नदयांचे संरक्षण करू या
स्वच्छता सतत राखू या
पर्यावरणाचे रक्षण करूया

पर्यावरणाचा समतोल  ठेवूया
जीवसृष्टीला मदत करू या
निसर्गाच्या कुशीत राहू या
 जीवन आनंदाने जगूया

प्लास्टिकवर बंदी आणूया
पर्यावरणाची जन जागृती करूया
स्वच्छ    भारत   घडवूया
एक    झाड    लावूया

धरतीवर नंदनवन फुलवू या
झाडे  तोडण्यास  विरोध करुया
हिरवळ   सतत    ठेवूया
झाडे लावण्याचा संकल्प करुय
सौ. सुअंता तांबे/टाचतोडे
वाशी. ता. वाशी
जि. उस्मानाबाद

मो.नं. 9O11844O45

-----------------------------------------------------------------------------------
अंधश्रद्धा निर्मूलन

सुजलाम सुफलाम देश
आपला
अंधश्रध्देत   कसा
गुरफटला
मानवानेच देव मांडला
समाधानासाठी नवस केला

भानामतीला विरोध करू
या
अंधश्रद्धा दूर करू या
विज्ञानाचा आधार घेवू या
साधू संतांचा नायनाट करू
या

मानवाने विश्वास ठेवला
स्वतःचा जीव धोक्यात
घालवला
विरोध कधी नाही केला
आपलाच माणूस कसा
फसला

नीट नजर भोंदूवर टाकू या
समाजाला जागरूक
करू या
अंधश्रद्धा निर्मूलन करू या
नविन पिढीला वाचवू या

श्री राजेंद्र टाचतोडे
मु.पो. पारा
ता. वाशी जि. उस्मानाबाद

मो.नं .9O11459412
---------------------------------------------------------------------------------------

 पुत्र भारतमातेचे
या भारतमातेच्या शहीद वीरांना
आमुचा कोटी कोटी प्रणाम
आमुचा कोटी कोटी प्रणाम

तळहातावर प्राण घेऊनी
निसर्गाची आव्हाने स्विकारूनी
शत्रुचांही घात पेलूनी
शत्रुनां सडेतोड उत्तर देऊनी
सामर्थ्य आपले दाखवी


या भारतमातेच्या शहीद वीरांना 
आमुचा कोटी कोटी प्रणाम 
आमुचा कोटी कोटी प्रणाम

मोहमायेचा त्याग करूनी
देशप्रेमाचे प्रतिक बनुनी
जनतेचे रक्षक म्हणोनी
शत्रुनां आव्हांन देवूनी
सामर्थ्य आपले दाखवी

या भारतमातेच्या शहीद वीरांना
आमुचा कोटी कोटी प्रणाम 
आमुचा कोटी कोटी प्रणाम


सुरेखा गणपतराव माने
सांगली. 7387901647

----------------------------------------------------------------------------------    
 नवा विचार 
लेकी विना माया नाही
म्हाता-या आई - बापाला
लेकी विना नात नाही
समाजातल्या गोत्याला

आयुष्याच्या वेलीवरची कळी
फुलण्याआधिच नका ओ तोडु
मुलगी म्हणुनी मारू नका ओ गर्भात
हीच ती तुमच्या घराची पणती
उजवळेल दोन्ही घराच्या भिंती

नवनिर्मितीचे वरदान तिच्या पोटी
नका हो तिला मारू आईच्या पोटी
जन्म घेण्याचा ही अधिकार नाही का ओ
या पुरूषी समाजात

नवा जमाना नवे विचार
मुलगा मुलगी आम्हां समान
या विचाराने पुढे जाऊ
प्रत्येक मुलीला जन्म देऊ
प्रत्येक घराला घरपण देऊ

मुलगी वाचवा मुलगी शिकवा
या समाजाला हा नवा विचार देऊ


सुरेखा गणपतराव माने
सांगली.7387901647



--------------------------------------------------------------------------------------------------------------------------


वणवे

झाडांनो तुम्ही
सळसळत नसता
तगमगत असता ...

घुसमटल्या
मुक्या उसाशांना
वाट शोधत असता ...

ही तडफडही
जेव्हा श्वास गमावते
तेव्हा तुम्ही पांगळे असता ...

सारं संपवण्यासाठी
ओसाड उद्यासाठी
कदाचित तुम्ही
वणवे चेतवत असता...

झाडांनो तुम्ही,
सळसळत नसता
घुसमटत असता ...
 

 ------गणेश जोतीबा गोडसे -----

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कधी हे रूप जाणणार
( चाल :- अरे संसार संसार , जसा तवा आणि चूल )

अरे माणसा माणसा , कधी हे रूप जाणणार
हा नाशिवंत देह , तुला परत ना मिळणार     ।। धृ ।।

जे - जे दिसते डोळ्याने , आहे ते नश्वर
अंग-संग भरलेला , हा देव निराकार
अरे माणसा माणसा , कधी हे रूप जाणणार
हा नाशिवंत देह , तुला परत ना मिळणार     ।। १ ।।

सर्वावरती याची सत्ता , हाच कर्ता करविता ,
जगाचा हा चालक , साऱ्या सृष्टीचा मालक ,
अरे माणसा माणसा , कधी हे रूप जाणणार
हा नाशिवंत देह , तुला परत ना मिळणार     ।। २ ।।

अरे माणसा माणसा , जा सद्गुरू शरण,
पहा देव निरंकार , मग होईल कल्याण ,
दाता तुझ्याच कृपेने झालं आत्म्याच लगीन ,
सद्गुरू चरणी मस्तक रहावा , "विजय" हे तू जाणं ।

अरे माणसा माणसा , कधी हे रूप जाणणार
हा नाशिवंत देह , तुला परत ना मिळणार     ।। ४।।


:- विजय रमेश बामुगडे
( क्रीडाशिक्षक , पुणे )
९६२३९९२६६६
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------


आभासी प्रेम
मोबाईल आता मानवाची
चौथी बनली गरज आहे,
त्याच्याविना जगणे आता
जगणे झाले निरस आहे

दिवसराञ याचा आता
सहवास सर्वाना हवा आहे
सवत बनून नवराबायकोंत
निर्माण केला दुरावा आहे

पोरांबाळानांसुद्धा मोबाईल
सहज लवकर मिळत आहेत
मोबाईल हातात असला तरच
जेवण आता करत आहेत

मोबाईलची वाढली किंमत परंतु
माणुसकीची कमी झाली आहे
मनाच्या एका हळव्या कप्प्यात
मानवतेची जागा खाली आहे

दुःखद असो की सुखद घटना
मोबाईल संदेश कामाचा आहे
खरं सांगतो गुंतू नका यात
हा खेळ आभासी प्रेमाचा आहे

प्रकाश बाबुराव डुबे
जिंतुर
ता.जिंतुर जि.परभणी
मो.नं.९१७५७४२४४१

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

रिमझीम धारा
आषाढाच घन दाटताच
रिमझीम धारा बरसल्या
चिंब चिंब भिजवून माझ्या
चेहऱ्यावरून ओघळल्या ||||

आल्या रिमझीम धारा छान
गेले सारे विसरून भान
ओलेचिंब झाले माळरान
धरित्रीची भागली तहान ||||

आला पाऊस मृग पाऊली
धग तप्त मातीची नीवली
नव्या जोमानं नदी वाहली
नवसाला अंबाच पावली ||||

धुंद वारा छेडीतसे तान
मान डोलवी हळूच पान
नदी नाले ओहळ वाहून
गाती निर्झर मंजुळ गाणं ||||

पिके मातीत मोत्याचे धन
दूर होईल अवघे दैन्य
ठाई ठाई दिसेल चैतन्य
सुख घेऊन आला पर्जन्य ||||

कसे पडती टपोरे थेंब
वेली झाल्या भिजोनिया चिंब
अंकुरण्या धरा प्रसवून
उगवले मातीतून कोंब ||||

सौ.अनिता नरेंद्र गुजर

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

जणू इंद्रधनुष्य तू
निसर्ग सजविला
इंद्रधनुष्याने सारा,
शोभून दिसतात सात रंग
बेभान सुटला वारा ||||

इंद्रधनुष्य तर मला
तुझ्या डोळ्यांत दिसतो,
आसवांचा पाऊस
तुझ्या नजरेतून वाहतो ||||

आहे सात रंगात जादू
ठेव मनावर काबू,
दिसून येई इंद्रधनुष्य तू
तुझ्यात आहे अनेक जादू ||||

या इंद्रधनुष्याचं तर
कैतूक फार मला,
असे कसे सजलेले रंग
दिसतात तुझ्या शोभून सौंदर्याला ||||

होती एक पावसाची सर
येवून ती गेली,
साक्षात इंद्रधनुष्यात जणू तू
माझ्या समोर उभी राहीली ||||
जणू इंद्रधनुष्य तू...जणू इंद्रधनुष्य तू ...

कवी - अमित अनंत मोरे
ता.गुहागर जि. रत्नागिरी

मोबा.७९००१५६७५६

पाहिला पाऊस
नजरेत माझ्या भिडला
नयनात माझ्या रूजला
मला बघुन सहज तो गहिवरला 
माझ्या अंगावर अचानक कोसळला    
खट्याळ लबाड तो पहिला पाऊस पडला
हळूच स्पर्श त्याला झाला
दवबिंदुने त्याच्या अंगावर शहारा झाला    
भेटण्याची ईच्छा  नसताना मनाला स्पर्श करून बसला   
खट्याळ लबाड तो पहिला पाऊस पडला   
कोमल ते माझे अंग        
झाले ओले चिंब   मातीचा सुगंध सुटला    
मानवास मो ईश्वररुपात भेटला        
खट्याळ लबाड तो पहिला पाऊस पडला     
चाहूल लागली चातकाला      
कुहू कुहू करत पावशा आला        
गारगार झुळकेले भिनाला      
धरती वरती जणु  स्वर्ग अवतरला   
खट्याळ लबाड तो पहिला पाऊस पडला
     
राजेंद्र बाबासाहेब टाचतोडे     
 पारा

मोः 9O1145942


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

भीक
पहिल्या प्रहरी झोपडी सोडली
पोरे नव्हती अजुन जागी झाली
उन्हे आली मध्यांवर आता...
  ........बाई मला थोड वाढता?

टाकती जरी तुकडा भाकर

हसाडती वर शिव्या चार
ऐकुनिया हे कान किट्टले आता
........बाई मला थोड  वाढता?

थकले पाय चाल चालूनिया

सुकली वाणी विनवण्या करुनिया
फिरू लागली वर्तुळे डोळ्यांभोवती आता
...................... बाई मला थोड वाढता?

मजल्यावरूनी टाकती तुकडा

झेलू जाता पाय होई वाकडा
घायाळ जाहलो तोल सावरता
........बाई मला थोड वाढता?

ताज्या पक्वान्ने रोग तुम्हा जडती

आम्ही तर शिळ्या पाक्यावर जगती
दुर्बल झाली  शिणली काया आता
................बाई मला थोड वाढता?

तुटली काठी फुटली वाटी

चिंधी झाली झोळीची
संपवितो माझी जीवन गाथा
......बाई मला थोड वाढता?

.       _सौ वैशाली वि. आठवले,


        पंढरपूर- 📞- 9766125303
बीज रडती कुशीत

---------------------------------------------------------------------------------------------------------

पाच दिसाचं ते येणं

आम्हा पेरणीचं भान
दगा दिलास तू असा
समदं बिखरलं रान

बिजा आले रे अंकुर

त्याले पाण्याची रे आस
दुबार पेरणी सोसला
मी आधीच वनवास

लई सांगे ते दमानं

खातं   हवामान
जोर धरेल पाऊस
अतिवृष्टीच्या नावानं

अंदाज त्यांचे सारे

आता विरले हवेत
काळ्या मायेच्या लेकरा
पावसा घेणारे कवेत

बीज रडती कुशीत

काय तुझं हे वागणं
येणा रानी तू पावसा
आहे एकच मागणं

भार आहे डोईवर

सावकाराचं देणं
लई आहे रे मोलाचं
पावसा तुझं येणं

          - रंगनाथ तालवटकर

             चिखली (कोरा)
             त.समुद्रपूर जि. वर्धा

              ७३८७४३९३१२

---------------------------------------------------------------------------------------------------------

माझा शेतकरी बाप

राबतो बाप माझा
काळ्या ढेकळ्याच्या रानात
आई फिरते सरपणासाठी
काट्या तुट्याच्या वनात

राब राब राबूनी रात्री स्वप्न
मुलांच्या भविष्याची पाहतो
दुपारी थकल्यावर मात्र
भाकरी तळहातावर खातो

मेहनतीचे फळ त्याला
नाही हो कधी मिळाले
सोन्या सारखा कांदा त्याचा
रस्त्यावर फेकावे लागले

त्याच्या जीवावर खातात
पुरणाची पोळी तुपाशी
म्हणतात जगाचा पोशिंदा त्याला
तोच मात्र झोपतो उपाशी

किती करितो मेहनत तो
त्याच्याच छळ चाललाय इथे
कोणत्या जन्माच पाप
फेडतोय तो आज इथे

रामकृष्ण पांडुरंग पाटील
विखरण,ता.जि.नंदुरबार
मो.क्र.9408885775


--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
जीवन
जीवन जगताना खूप कष्ट आहे,
माणसाच्या नशीबी लागलेला शाप आहे ||

प्रत्येक वाटेत जखमी काटे आहे,
संघर्ष करुनी स्वतःशी जगतो आहे ||

जगताना जीवनातल्या भावना व्यर्थ आहे,
कापून टाकले विचार माणासाचे आहे ||

अंधार पडला पूर्ण जीवनात आहे,
पेटलेली ज्योत आज विजत आहे ||

धावते आयुष्य सगळे जगत आहे,
जीवन हळूच संपत जात आहे ||

सोसतो घाव जीवनात आहे,
माणसाच्या जीवनी दुःख आहे ||

जीवन जगण्याचा आधार कोण आहे,
न्याय द्यायला कोणी उरले नाही आहे ||

कवी:- अमित अनंत मोरे
मु.पो,शीर
ता. गुहागर / जि.रत्नागिरी मो.७९००१५६७५६
---------------------------------------------------------------------------------------------------------
|| अभंग ||
      
मित्र सारे माझे | असे जीव प्राण
मिळे समाधान | शास्वत  ||

मित्रची असती | माझे विश्व सारे
आनंद देणारे   | नेहमीच   ||

मित्रां मुळे मिळे| आनंद जीवनी
जीवन रंगुणी    | जात असे   ||

जिवनात मित्र | भरपूर जोड़ा
पळतसे घोड़ा | जिवनाचा  ||

मित्रांची सोबत | भजनी संगत
जीवनी रंगत    | सदा असो  ||

मित्रांच्याच मुळे |  कळे नाना कळा
येई कळवळा | जिवनात ||

जाणून मैत्रीचे  | जिवनात मोल
मित्र अनमोल | जोडू आम्ही  ||

मैत्री अनमोल | सार जीवनाचे
तुम्हा महत्वाचे | सांगे राज   ||

सदा आयुष्यात | चार मित्र जोड़ा
मित्रांचा हा ओढा  | आटू नये   ||

कवी ,,, राजेश सोनार (सागर )
धुळे ,,,९५८८४०५२०७
---------------------------------------------------------------------------------------------------------

7 comments: